Bidri Sakhar Karkhana Election : जाणून घ्या उत्पादक गटातील उमेदवारांची मते | पुढारी

Bidri Sakhar Karkhana Election : जाणून घ्या उत्पादक गटातील उमेदवारांची मते

बिद्री : पुढारी वृत्तसेवा: बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ५) सकाळी सुरू झाली. सत्ताधारी गटाने निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशे आगेकूच सुरु ठेवली आहे. दरम्यान, सध्या मतमोजणी सुरू असून उत्पादक गटातील उमेदवारांना १ ते १२० अशी केंद्रनिहाय पडलेली मते जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणाला किती मते पडली.

Bidri Sakhar Karkhana Election

बिद्री सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी ६ वाजेपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

आज सकाळी आठ वाजता पहिल्या टप्प्यातील 120 मतदान केंद्राची मतमोजणी सुरू झाली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 51, कागल तालुक्यातील 48, भुदरगड तालुक्यातील 21 केंद्राची मोजणी 1.30 वा. पर्यत झाली असून आतापर्यंत तब्बल 34 हजार 489 मतांची मोजणी झाली आहे.

जेवणानंतर दुसऱ्या टप्प्यातील 53 केंद्रांची मतमोजणीस सुरूवात होणार आहे. भुदरगड तालुक्यातील 42 व करवीर तालुक्यातील 21 केंद्रांतील 14 हजार 451 मतांची मोजणी होईल. सहा वाजेपर्यंत सर्व मतमोजणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांनी केलेल्या नियोजनामुळे लोकांना निकाल वेळेत मिळणार आहे. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत निकालाची प्रतिक्षा करावी लागत होती, मात्र यावेळी बिद्रीच्या इतिहासात प्रथमच इतक्या लवकर निकाल मिळणार असल्‍याने सभासदांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा 

Back to top button