Chandgad Drugs Case : ढोलगरवाडी छाप्यात २.३५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त | पुढारी

Chandgad Drugs Case : ढोलगरवाडी छाप्यात २.३५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : Chandgad Drugs Case :  मुंबईसह महाराष्ट्रभर विक्री होणारे एमडी ड्रग्ज कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात तयार केले जाते, यावर सांगूनही विश्वास बसणार नाही. मात्र, चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीत एका फार्म हाऊसमध्ये वकील राजकुमार राजहंसने सुरू केलेला एमडी ड्रग्जचा कारखाना मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केला आहे. कुक्कुटपालन आणि शेळीपालन करत असल्याचा आभास निर्माण करत हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. या कारवाईत ड्रग्ज आणि कच्चा माल असा एकूण 2 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Chandgad Drugs Case : ढोलगरवाडी छाप्यात २.३५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

Chandgad Drugs Case : ढोलगरवाडी छाप्यात २.३५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त 

 

 

 

Rakul Preet Singh : रकुलप्रीत-जॅकी रिलेशनशीपमध्ये

पोलिसांनी मुंबईत ड्रग्ज विकणारी क्रिस्टीना मॅगलीन ऊर्फ आयेशा ऊर्फ सिमरन आणि फार्म हाऊसचा म्हणजेच या ड्रग्ज कारखान्याचा केअरटेकर निखिल लोहार या दोघांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार वकिल राजहंसचा शोध सुरू केला आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या हायप्रोफाईल प्रकरणाचे मुंबई ते ढोलगरवाडी कनेक्शन असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुख्य संशयित अ‍ॅड. राजकुमार अर्जुनराव राजहंस (वय 51) हा मूळचा ढोलगरवाडीचा असून, सध्या त्याचे वास्तव्य मुंबईत आहे. ढोलगरवाडीत मेफिड्रीन (एमडी) ड्रग्जचे उत्पादन करून मुंबईसह राज्यभर या ड्रग्जची तो विक्री करत असल्याचे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या कारवाईत उघड झाले आहे.
Rinku Rajguru : रिंकूनं चाहत्यांना दिली खुशखबर; नवे फोटो केले शेअर

मिळालेल्या खास माहितीवरून अमली पदार्थविरोधी विभागाच्या वांद्रे कक्षाने 12 नोव्हेंबरला साकीनाका, खैरानी रोड येथे सापळा रचून क्रिस्टीना मॅगलीन ऊर्फ आयेशा ऊर्फ सिमरन हिला ताब्यात घेतले. तिच्याजवळ पाच लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. हे ड्रग्ज एका व्यक्तीने आपल्याला दिले असून, तसेच हे ड्रग्ज कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यात असलेल्या ढोलगरवाडीतील एका कारखान्यामध्ये बनवले जात असल्याची माहिती तिने पोलिस चौकशीत दिली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या पथकाने चंदगड पोलिसांच्या मदतीने ढोलगरवाडीमधील त्या फार्महाऊसवर छापा टाकला असता 122 ग्रॅम एमडी आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा 38 किलो 700 ग्रॅम कच्चा माल हाती लागला. केमिकल, काचेची उपकरणे, ड्रायर आणि अन्य साहित्य असा एकूण 2 कोटी 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत पोलिसांनी फार्म हाऊस सील केले.

ही कारवाई मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अप्पर आयुक्त वीरेश प्रभू, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, पोलिस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा युनिटचे प्र.पो.नि. संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. लता सुतार, दहिफळे, सपोनि वाहिद पठाण, सिद्धराम म्हेत्रे, फरिद खान, सुरेश भोये व सहकार्‍यांच्या पथकाने केली.

मुख्य संशयित अ‍ॅड. राजहंस फरार

  • मुख्य संशयित अ‍ॅड.राजकुमार राजहंस आहे. राजहंसचा शोध सुरू असून, तो मुंबईवरून ढोलगरवाडी गावात कच्चा माल घेऊन येत असे व एमडी ड्रग्ज घेऊन मुंबईला जात असे.
  • फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार याचाही मोठा सहभाग आहे. मुंबईसह राज्यभरात एमडी सप्लाय करण्यात राजहंस आणि लोहार या दोघांचाही सहभाग आहे.
  • क्रिस्टीना मॅगलीन ऊर्फ आयेशा ऊर्फ सिमरन हिच्यामार्फत या ड्रग्जची विक्री करण्यात येत असे. या प्रकरणात आणखी ड्रग्ज पेडलर असावेत, त्यांची स्थानिक पुरवठा करणारी साखळी असावी, असाही पोलिसांना संशय आहे.

बडी धेंडे, सेलिब्रिटी ‘रडार’वर

ढोलगरवाडी ते मुंबई आणि बॉलीवूडशी संबंधित हे प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली होती. तीन दिवस छाप्याची कारवाई सुरू असतानाही पोलिसांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला होता. स्थानिक पत्रकारांनाही फार्म हाऊसपासून काही अंतरावरच रोखण्यात येत होते.

तीन वर्षांपासून पोलिस मागावर

तीन वर्षांपासून पोलिस राजहंसच्या मागावर होते. क्रिस्टीना मॅगलीन ऊर्फ आयेशा ऊर्फ सिमरन हिच्या अटकेनंतर पोलिसांनी ढोलगरवाडीत छापा टाकण्याचे ठरवले. ढोलगरवाडी येथील छाप्यानंतर फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल रामचंद्र लोहार यालाही अटक करण्यात आली आहेे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, आणखी संशयितांचा शोध सुरू आहे.

Back to top button