Bhogavati election P.N.Patil : संस्थांच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आमच्यावर टीका करु नये : पी. एन. पाटील | पुढारी

Bhogavati election P.N.Patil : संस्थांच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आमच्यावर टीका करु नये : पी. एन. पाटील

राशिवडे; पुढारी वृतसेवा : चाळीस वर्षाच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात कोणत्याही संस्थेवर एक रुपयाचा खर्च टाकलेला नाही. निस्वार्थी भावनेने सभासदांचे हित जोपासले आहे. मात्र जे सहकारी संस्थांच्या जीवावर मोठे झालेत ते आमच्यावर टीका करत आहेत, ही बाब दुर्दैवी असल्याची घणाघाती टीका आमदार पी. एन. पाटील यांनी केली. ते राशिवडे बु. (ता. राधानगरी) येथील राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी अशोक पाटील होत्या. तर गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

संबंधित बातम्या : 

आमदार पाटील पुढे म्हणाले की, ज्यांना मी व ए. वाय. पाटील यांनी चेअरमन केले ते आज आमच्यावर टीका करून सभासदांची दिशाभूल करत आहेत. त्यांना भोगावतीचे स्वाभिमानी सभासद घरी बसविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले की, भोगावतीचे एक चांगले व्हिजन घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत, अडचणीतील भोगावती फक्त पी. एन. पाटीलच वाचवू शकतात, म्हणूनच आम्ही पी. एन. यांच्यासोबत आलो आहे.

यावेळी जनता दलाचे वसंतराव पाटील, शेकापचे क्रांतीसिह पवार-पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे यांचीही भाषणे झाली. यावेळी जेष्ठ नेते कृष्णराव किरुळकर, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, बाळासाहेब खाडे, उदयसिंह पाटील, भारत पाटील भुयेकर, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे, माजी सरपंच प्रकाश चौगले आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन एकनाथ चौगले यांनी तर स्वागत नंदूभाऊ पाटील यांनी केले. प्रास्ताविक विद्यमान संचालक कृष्णराव पाटील यांनी केले. सागर धुंदरे यांनी आभार मानले.

भोगावतीच्या हितासाठीच एकत्र : क्रांतीसिह पवार-पाटील

शेकापचे युवा नेते क्रांतिसिंह पवार-पाटील म्हणाले की, वैयक्तीक प्रतिष्ठा, मोठापणा यापेक्षा भोगावती सभासद मालकीचा ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत. टिका टिप्पणी न करता कारखाना वाचविण्यासाठी काय नियोजन करणार? यावर चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

उमेदवारी मिळाली नाही म्हणुन निर्णय दुर्दैवी

शेकापचे कुमार पाटील यांनी ‘आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून बाबासाहेब देवकर क्रांतीसिह पवार-पाटलांचा निर्णय दुर्दैवी म्हणतात,’ अशी टीका केली.

हेही वाचा : 

Back to top button