चेअरमनपदाचा त्याग करून आ. पी. एन. पाटील यांनी आदर्श ठेवला : ए. वाय. पाटील

चेअरमनपदाचा त्याग करून आ. पी. एन. पाटील यांनी आदर्श ठेवला : ए. वाय. पाटील
Published on
Updated on

राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सहकार क्षेत्रात वयोवृद्ध होईपर्यत चेअरमन पदाला चिकटून बसणाऱ्यांची संख्या मोठी असताना भोगावती साखर कारखान्याचे  अध्यक्ष आमदार पी. एन . पाटील सडोलीकर यांनी  संपूर्ण बहुमत पाठीशी असताना चेअरमन पदाचा त्याग करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष व जनता दलाच्या आघाडीला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. Bhogavati Sugar Factory election

हसुर दुमाला येथे राजर्षि शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, आमदार पी. एन .पाटील यांनी गेले ४० वर्षे सहकारात आपल्या कामाचा मानदंड निर्माण केलेला आहे. सलग सहा वर्षे भोगावती साखर कारखाना आर्थिक अडचणीतून वाटचाल करत असताना त्यांनी हा कारखाना मार्गावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत .काटकसर पारदर्शक व सभासद हिताचा कारभार करत त्यांनी प्रत्येक वर्षी सभासदांची ऊस बिले दिलेले आहेत. त्यांच्या सत्ता काळातील कर्मचाऱ्यांचे ७२ पगार भागवले. ऊस तोडणी ओढणीची बिले ही दिलेले आहेत.  त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दोन वेतन कराराच्या वाढी फरकास लागू करून सर्वच घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. विरोधी आघाडी करणाऱ्या मंडळींनी खासगी मालकाकडे चालवायला दिलेला डिस्टलरी प्रकल्प कारखान्याच्या मालकीचा केला आहे. आगामी काळात त्यातून उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे भोगावतीला केवळ आमदार पी. एन. पाटील हेच वाचवू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

भोगावती साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याची धमक केवळ आमदार पाटील यांच्या अंगी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष व जनता दलाने आघाडी करून सभासदांना सामोरे जात आहोत. ज्यांना मी व आमदार पाटील यांनी चेअरमन पद दिले, त्यांनीच हा कारखाना आर्थिक अरिष्ठात ढकलला आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व गोकुळचे संचालक किसन चौगुले यांनी भोगावती साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा. या स्वार्थासाठीच आम्ही आघाडी केलेली आहे. त्याचबरोबर २१४ मुलांच्या नावावर असणारे कर्ज परतफेड करणे व त्यांना सेवेत कायम करण्यासाठी आ. पाटील यांनी खूप मोठी मदत केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या कोल्हेकुईकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर आमदार पी. एन. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर, क्रांतिसिह पवार पाटील, अशोकराव पवार पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, राजेश पाटील सडोलीकर, पी. डी. धुंदरे. कृष्णराव किरुळकर, बी. के. डोंगळे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news