कोल्हापूर : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुद्वादशी सोहळा उत्साहात | पुढारी

कोल्हापूर : नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुद्वादशी सोहळा उत्साहात

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : येथील दत्त मंदिरात आज शुक्रवार (दि.१०) गुरुद्वादशी सोहळा उत्साहात पार पडला. सात दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांनी गर्दी केली होती. आज पहाटे साडेचार वाजता श्री दत्त मंदिरात काकड आरती झाली. त्यानंतर श्रींच्या चरणकमलावर दुपारी बारा वाजता महापुजा करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या मुर्तीला पानांनी सजवून गंधलेपनाची पूजा बांधण्यात आली.

देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे, चिटणीस विवेक हावळे व विश्वस्त यांच्या पुढाकाराने देवस्थानामार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात महापूजेच्या वेळी भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती सायंकाळी सात वाजता ब्रह्मवृंदानी पवमान पठण केले. रात्री दहा वाजता ह. भ. प. मंदारबुवा गोखले यांचे कीर्तन झाले. त्यानंतर  धूप, दीप आरती होऊन श्रींच्या उत्सव मूर्तीचा पालखी सोहळा संपन्न झाला.

हेही वाचा :

 

Back to top button