Latest
शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचे ४०० रूपये तत्काळ द्या; राजू शेट्टींची मागणी
पुढारी ऑनलाईन डेस्क : साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामामध्ये पुरवलेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रूपयाचा दुसरा हप्ता देण्याच्या मागणीसाठी आज (दि.१३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरातील साखर संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप यावेळी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
"शेतकऱ्यांना एफआरपी आणि ४०० रूपये देण्याची मागणी गेल्यावर्षी ऊस परिषदेत केली होती. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल गंभीर नाही. ऊस उत्पादकांना तात्काळ ४०० रूपयांचा दुसरा हप्ता द्यावा. मागचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय हा हंगाम सुरू होऊ देणार नाही," असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा :
- Maratha Reservation Manoj Jarange Patil | मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आज जरांगे पाटील यांची भेट घेणार
- राज्यातील अधिकार्यांच्या दिमतीला आलिशान गाड्या; आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते 46 वाहनांचे हस्तांतरण
- Maharashtra Politics : शिंदे, फडणवीस, पवारांचा 'ताे' व्हिडिओ व्हायरल, वडेट्टीवार म्हणाले…

