कोल्‍हापूर : अंबाबाई मंदिरात चांदीच्या उंबऱ्याजवळून दर्शन सुरू

अंबाबाई मंदिर
अंबाबाई मंदिर

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना देवीचे दर्शन पुन्हा चांदीच्या उंबऱ्याजवळून (गाभाऱ्यासमोर) घेण्याची सुविधा आजपासून सुरू करण्यात आली. भाविकांना पूर्वीप्रमाणेच गाभाऱ्याजवळून दर्शनाची सुविधा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली होती. त्‍या पार्श्वभूमीवर मंगळवारी अंतर्गत रांगेसाठी व्यवस्था पूर्ण करून घेण्यात आली.

कोरोना कालावधीत गाभाऱ्याजवळील चांदीच्या उंबऱ्यासमोरून दर्शन सुविधा बंद केली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या घोषनेनंतर आज (बुधवार) सकाळपासून पूर्वीप्रमाणेच चांदीच्या उंबऱ्यापासून भाविकांना श्री अंबाबाईच्या दर्शनाची सुविधा सुरू करण्यात आली. त्‍यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news