iPhone 15 launch : तारीख ठरली!! 'या' दिवशी होणार आयफोन 15 लॉंच, जाणून घ्या फिचर्स | पुढारी

iPhone 15 launch : तारीख ठरली!! 'या' दिवशी होणार आयफोन 15 लॉंच, जाणून घ्या फिचर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही Appleने पुन्हा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात Apple ने iPhone 15 सिरीज लॉंच करण्याची घोषणा केली आहे. नवीन आयफोन 15 सीरीज 12 सप्टेंबरला लॉंच होईल. आयफोनच्या डिझाईनमध्ये मोठा बदल होणार नाही, पण यावेळी ॲपल काही ग्राउंडब्रेकिंग फीचर्स देऊ शकते. (iPhone 15 launch)

ॲपलचा स्पेशल ईव्हेंट १२ सप्टेंबरला होईल असे जाहीर करण्यात आले आहे. (iPhone 15 launch). या अमेरिकन टेक कंपनीने लॉंच इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यावेळी डायनॅमिक आयलंडचे फीचर आयफोन 15 सीरीजच्या सर्व मॉडेल्समध्ये दिले जाईल, जे सध्याच्या आयफोन म्हणजेच आयफोन 15 सीरीजच्या प्रो मॉडेल्समध्ये दिले गेले आहे. याशिवाय अनेक छोटे-मोठे बदल पाहायला मिळतील.

आयफोन 15 मध्ये यावेळी अलर्ट स्लाइडरऐवजी बटण दिले जाऊ शकते. याशिवाय, अशीही बातमी आहे की आता iPhone 15 सीरीजसह चार्जिंगसाठी सी पोर्ट देईल. यापूर्वी, आयफोन चार्जर चार्जिंगसाठी वापरला जात होता, परंतु आता USB Type C सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अँड्रॉइड फोनच्या चार्जरने चार्ज करता येणार आहे.

iPhone 15 launch : काय आहे खास?

iPhone 15च्या स्क्रीनच्या आजूबाजूला बेझल्स कमी आणि स्क्रीन एरिया जास्त असेल. रिझोल्यूशन पूर्वीपेक्षा चांगले असेल आणि यावेळी देखील फेस आयडीचा सपोर्ट असेल. iPhone 15 सिरीजमध्ये नवीन प्रोसेसर आणि नवीन कॅमेरा सेटअप दिला जाईल आणि iOS चे नवीन व्हर्जनही दिले जाईल. 12 सप्टेंबरला जुन्या आयफोनमध्ये iOS चे नवीन व्हर्जन देखील दिले जाऊ शकते. अनेक वेळा कंपनी लॉन्च डेटसोबत दुसऱ्या जुन्या आयफोनमध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करते.

या इव्हेंटमध्ये iPhone 15, iPhone Plus लॉन्च केले जातील आणि दोन iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max देखील असतील. कंपनी Apple Watch Series 9 सह SE वेरिएंट देखील लॉंच करू शकते.

iPhone 15 launch इव्हेंट कधी सुरू होईल आणि कसा पाहावा?

12 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता सुरू होईल. साधारणपणे हा कार्यक्रम 1 तासाचा असतो. ॲपलचे सीईओ टीम कुक यादरम्यान नवीन आयफोन लॉंच करणार आहेत. यावेळी कंपनीने निमंत्रणात वंडरलस्ट लिहिले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या मुख्यालय Apple पार्क येथून केले जाईल. ॲपलच्या वेबसाइट आणि यूट्यूबवर ते थेट पाहता येईल.

Back to top button