Delhi Firing : दिल्ली गोळीबाराने हादरली; ॲमेझॉनच्या सिनिअर मॅनेजरचा मृत्यू

firing
firing

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi Firing : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली आहे. दिल्लीच्या भजनपुरा येथे काल मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. पाच तरुणांनी दोन लोकांना गोळ्या घातल्या. या गोळीबारात ॲमेझॉनच्या सीनियर मॅनेजरचा मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमर उजालाने याचे वृत्त दिले आहे.

हरप्रीत गिल (वय 36 रा. पुत्र कर्नल सिंह रहिवासी सी-35, गल्ली क्रमांक 1, भजनपुरा) असे मयत ॲमेझॉनच्या सीनियर मॅनेजरचे नाव आहे. तर गोविंद सिंह (वय 32, रा. पुत्र बसंत सिंह रहिवासी सी-35, गल्ली क्रमांक 1. भजनपुरा) हा जखमी झाला आहे.

Delhi Firing : गोळीबार करून आरोपी फरार

घटना भजनपुराच्या गल्ली क्रमांक 8 जवळ घडली आहे. माहितीनुसार, रात्री उशिरा हरप्रीत गिल आणि गोविंद सिंह हे दोघे गली नंबर 8 जवळ बाइकवर होते. त्याचवेळी एक स्कूटी आणि एक बाइकवर स्वार पाच तरुणांनी त्यांना अडवले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून गेले.

दरम्यान, जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. येथे हरप्रीत गिलला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हरप्रीत गिल अमेझॉनमध्ये सीनियर मॅनेजर होते. तर गोविंद सिंहला गंभीर स्थितीत असून त्याला एलएनजेपीला नेण्यात यावे म्हणून सूचवण्यात आले आहे. गोविंद सिंह हंग्री बर्ड नावाने मोमोची दुकान चालवतो.

सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहे. तसेच गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोळीबाराच्या घटनेमागील खरी कारणे शोधली जात आहेत. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. (Delhi Firing)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news