कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; कोल्हापूरचे माजी महापौर व कोल्हापूर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दुपारी १ वाजता त्यांच्या अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र कोल्हापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेचे ते ३५ वर्षे नगरसेवक होते. ते उत्तम फुटबॉलपटूही होते.
हे ही वाचा :