कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होणार : राजेश क्षीरसागर

कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होणार : राजेश क्षीरसागर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघातील भावी खासदार शिवसेनेचेच असतील. कोल्हापूरचा महापौरही शिवसेनेचाच असेल. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील, अशी अपेक्षा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. 'कोल्हापूर दक्षिण'मध्ये यावेळी कोण आमदार कसे होतेय ते आम्ही पाहू. येथेही आमची ताकद दाखवून देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

क्षीरसागर म्हणाले, खंडपीठासह जनतेच्या हिताचे सगळे निर्णय येत्या काही महिन्यात मार्गी लागतील; अन्यथा निवडणुकीला सामोरे जाणार नाही. कन्व्हेन्शन सेंटर, गांधी मैदान विकास, रंकाळा सुशोभीकरणाला काही महिन्यांत जवळपास 500 कोटी रुपयांचा निधी विकासकामांना मंजूर झाला आहे. निधी कोण आणत आहे, हे जनतेला ज्ञात आहे. केवळ कागद दाखवून निधी मिळत नाही. त्यासाठी प्रश्नांची दाहकता मांडावी लागते. मात्र शहरात संभ्रम माजविणारे आणि विकासकामांना विरोध करणारे टोळके तयार आहे.

कन्व्हेन्शन सेंटरचे विस्तारीकरण, 243 कोटींचा आराखडा

कोल्हापूर कन्व्हेन्शन सेंटरचा विस्तार करून आता 243 कोटी रुपयांचा आराखडा झाला आहे. या ठिकाणी क्रिडाई संस्था, बांधकाम व्यावसायिकांसाठी दालनची उभारणी, अद्ययावत नाट्यगृह होणार आहे. कोल्हापूर फुटबॉल अ‍ॅकॅडमीसाठी 300 कोटी रुपये मिळणार आहेत. शेंडापार्क येथे 20 एकर जागेत फुटबॉल अ‍ॅकॅडमी प्रस्तावित आहे.

महाराणी ताराराणींच्या नावाने सैनिक स्कूल

महाराणी ताराराणी यांच्या नावाने सैनिक स्कूल सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात शंभर एकर जागेची गरज आहे. सरकारी जागेवर सैनिक स्कूल असेल. राधानगरी परिसरात जागेची पाहणी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी एका अधिकार्‍यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे, अशी माहीतीही राजेश क्षीरसागर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news