कोल्हापूर : ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ची उत्स्फूर्त प्रतिसादात सांगता | पुढारी

कोल्हापूर : ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ची उत्स्फूर्त प्रतिसादात सांगता

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल- 2023’ प्रदर्शनाची सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात सांगता झाली. राज्य, देश-विदेशातील पर्यटनाची संपूर्ण माहिती एकाच छताखाली मिळाल्याने पर्यटनप्रेमींनी समाधान व्यक्त केले. शेवटच्या दिवशी पर्यटनप्रेमींची प्रदर्शनास अलोट गर्दी पाहायला मिळाली.

दै. ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स – 2023’ प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात सुरू होते. अ हेवन हॉलिडे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक होते. पॉवर्ड बाय गगन टूर्स होते. मिनिस्ट्री ऑफ टुरिझम- गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया सहप्रायोजक होते. गेले तीन दिवस प्रदर्शनातील जगप्रसिद्ध पर्यटन संस्था, नामवंत टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्टॉलसला हजारो नागरिक, पर्यटकांनी भेट दिली.

बर्‍याचवेळा पर्यटन स्थळांची माहिती नसल्याने अनेकांना अडचणी येतात. ज्येष्ठ नागरिक खासकरून कुटुंबातील महिलांची सोय याची काळजी असते. ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स’ प्रदर्शनाच्या निमित्ताने पर्यटनस्थळांची माहिती नागरिकांना मिळाली. शेवटच्या दिवशी रात्री आठपर्यंत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शनातील स्टॉलला भेट देऊन माहिती घेत होते. काहींनी देश-विदेशातील पर्यटन स्थळे, तेथील प्रवासाची सुविधा, राहणे, भोजनाची सोय, संपूर्ण पॅकेज, फॅमिली पॅकेजबद्दल टूर्स कंपनीच्या प्रतिनिधींकडून माहिती जाणून घेतली. त्यानुसार अनेकांनी कुटुंबासह देशासह परदेशी पर्यटनाचे नियोजन केले. काहींनी टूर्सचे बुकिंग करून कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला. देश-विदेशातील धार्मिक, ऐतिहासिकसह विविध पर्यटनस्थळांची माहिती मिळाल्याचा पर्यटकांमध्ये उत्साह, आनंद होता. प्रदर्शनास ग्राहक, पर्यटकांचा प्रतिसाद लाभल्याने स्टॉलधारक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा :

Back to top button