कोल्हापूर : उत्रे येथे जनावरांच्या गोठ्याला आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : उत्रे येथे जनावरांच्या गोठ्याला आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील गुंडा कृष्णा हांडे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. यात घरही जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एक म्हैस वाचवण्यात आली.

मठाचा माळ या ठिकाणी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेत एक गाभण म्हैस, गाय, पाडी व एका रेडीचा होरपळून मृत्यू झाला. घरासह, इतर जळण, वैरण, धान्य, कपडे जळून खाक झाले आहेत. यामध्ये सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी विकास मोहिते, पोलीस पाटील बळवंत पाटील, सरपंच के.एम.पाटील, अमर पाटील, डॉ. पोवार आदींनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button