

म्हाकवे, पुढारी वॄतसेवा : आजकाल वरात म्हटलं की, डॉल्बी, दारू, अश्लील हावभाव, नृत्य आलंच. पण पारंपरिक पद्धतीने आधात्मिक स्वरूपाची वरात निघाल्यानंतर ती किती देखणी व सुबक असते. याचा प्रयत्य म्हाकवे येथे आला. रात्रीच्या लख्ख प्रकाशात वारकऱ्यांच्या दिंडीने काढलेल्या वरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
देवाच्या नामस्मरणात सुद्धा लग्नाची वरात सुंदर पद्धतीने निघू शकते, हे सुखदेव पाटील व डी. एच. पाटील या बंधूनी दाखवून दिले. डॉल्बीला फाटा देऊन आध्यात्मिक वरात किती देखणी दिसते, हे आपल्या मुलाच्या लग्नातून त्यांनी दाखवून दिले आहे. अनेक लग्नांमध्ये श्रीमंतीचा डामडौल मिरवत डॉल्बीचा मुक्तपणे वापर केला जातो. परंतु पाटील परिवाराने अशा गोष्टींना फाटा देऊन लग्नाच्या वरातीला तुरंबे येथील वारकरी शिक्षण संस्थेतील मुलांना निमंत्रित करून आध्यत्मिक स्वरूपाची वरात काढली. असा उपक्रम गावातच नव्हे तर जिल्हात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. एक प्रकारे वैचारिक पातळीची ही वरात होती. मनामध्ये अशी वैचारिक पातळी निर्माण होणे फार मोठी गोष्ट आहे. नवरदेवानंही आपल्या वडिलांचा निर्णय स्वीकारत आधात्मिक वरातीला पसंती दिली. नाहीतर आजच्या तरुण पिढीला असा उपक्रम पचनी पडत नाही. आज व्यसनाच्या युगात अशा वैचारिक वरातींची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचलंत का ?