अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्‍नी मुलासह जीवन संपवले | पुढारी

अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्‍नी मुलासह जीवन संपवले

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा गडहिंग्लज शहरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी व मुलासह आज राहत्या घरी जीवन संपवल्‍याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये त्यांना जवळपास महिनाभराची जेलवारी करावी लागली होती. त्यानंतर ते बऱ्याच प्रमाणात ताणतणावात होते. तुरुंगातून आल्यानंतर पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, मात्र त्यामध्ये काही प्रमाणात अपयश येत असल्याचे दिसून आले होते.

संतोष शिंदे यांनी अगदी लहान वयातच मोठ्या प्रमाणात भरारी घेत अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत तेल उत्पादन, व्यायाम शाळा, बेकरी उत्पादने यासह विविध प्रकारची उत्पादने तसेच महाराष्ट्रासह मुंबई, कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योग विस्तारला होता. अशा परिस्थितीत ते जीवन संपवतील असे कोणालाही वाटले नव्हते, मात्र शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पत्नी मुलासह जीवन संपवले.

आज (शनिवार) सकाळी ते बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने अन्य शेजाऱ्यांना बोलवले असता दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केल्यानंतर बेडरूम मध्ये तिघांचे मृतदेह आढळले. यावेळी त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला विष पिऊन व त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून घेऊन त्‍यांनी जीवन संपवल्‍याचे लक्षात येते. यामध्ये शिंदे यांनी पत्नी व मुलासह  जीवन संपवल्‍याचे समाेर येत आहे.

हेही वाचा :

Back to top button