मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सांगितले. दुर्गम प्रदेशामुळे कंत्रादारांनी काढलेला पळ आणि भूसंपादनातील अडचणींमुळे या महामार्गाचे काम रखडले होते. मात्र, या अडचणी आता जवळपास पूर्णपणे सोडवण्यात आल्या असून डिसेंबर अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मराठी पत्रकार परिषदेच्या २०२२ या वर्षातील पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना एस. एम. देशमुख यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी कोकणातील पत्रकार सातत्याने आंदोलन करीत आहे. बारा वर्षांपासून हा रस्ता रखडलेला आहे. तो लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यावर मंत्री गडकरी यांनी सांगितले की, येत्या डिसेंबरपर्यंत या महामार्गाचे काम पुर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.
खरे तर दिल्ली-मुंबई हा १३०० किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाला. पण, अद्याप मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. कारण या महामार्गाचे काम पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या. या अडचणी आता जवळपास पूर्णपणे सोडवण्यात आल्या असून डिसेंबर अखेरपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्रातील पत्रकारितेचेही कौतुल केले. पत्रकारिता हे एक व्रत आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहेत. पण आज पत्रकारांना सत्य लिहिण्याची किंमत मोजावी लागते. कारण सत्य हे अनेकांना प्रिय नसते. मात्र त्यातही महाराष्ट्रात पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत, याचा खूप आनंद होतो. पत्रकारांतीचे एक गुणात्मक परिवर्तन आजही महाराष्ट्रात पाहण्यास मिळते. महाराष्ट्रातील पत्रकार ज्या पद्धतीने काम करतात, ते इतरत्र पाहण्यास मिळत नाही," असेही गडकरी यांनी यावेळी नमूद