कोल्हापूर : म्हाकवेत धुम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिना लंपास

कोल्हापूर : म्हाकवेत धुम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिना लंपास

म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचा एकसर दागिना हिसकावून धूम ठोकल्याचा प्रकार म्हाकवे (ता. कागल) येथे आज ( दि.२२) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडला. भरदिवसा घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुलोचना सिद्धाराम पाटील व रत्‍नाबाई पाटील या दोघी आज म्हाकवेतील आणूर रस्त्यावर सायंकाळी पाचच्या दरम्यान फिरायला गेल्या होत्या. या दोघी एका झाडाखाली बसल्या असताना गाडीवरून आलेल्या दोन तरूणांनी कोल्हापूरकडे जाणारा रस्ता कोणता असे विचारले. व रस्त्यावर कोणीही नसल्याचे निदर्शनास येताच सुलोचना पाटील यांच्या गळ्यातील एक तोळ्याचा एकसर हिसकावून धुम स्टाईलने पसार झाले. गेल्या काही दिवसांपासून म्हाकवे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चार दिवसापूर्वी आनुर येथील विद्युत मोटरीची चोरी झाली होती. त्यानंतर ही घटना घडली. भरदिवसा धूम स्टाईलने दागिने लंपास केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

            हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news