धानोरेत 9 तोळे सोन्यासह 55 हजारांची चोरी

file photo
file photo

धानोरे(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील धानोरे येथील मधला मळा परीसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली. यात 9 तोळे सोने व 55 हजार रुपये रोख असे सुमारे 6 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्यांची घटना घडली.
याबाबत माहिती अशी, धानोरे येथील मधला मळा शिवारात अरुण लहानु दिघे आपल्या पत्नी व मुलासह राहतात. मंगळवारी रात्री गाढ झोपेत असताना रात्री 12 ते 1 च्या वाजे दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाची उचकापाचक करत कपाटातील 9 तोळे सोने व 55 हजार रुपये चोरून पोबारा केला.

घरमालक अरुण दिघे हे कपाटाशेजारच झोपलेले असताना त्यानां थांगपत्ता न लागू देता, चोरट्यांनी ही चोरी केली. साधारण एक वाजेदरम्यान दिघे कुटुंबाला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शेजारील नागरीकांना जागे केले. चोरट्यांनी या वस्ती शेजारी असलेल्या सोपान दिघे यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तो अयशस्वी झाला.

नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिंदे वस्तीकडे वळवला. यावेळी शिंदे वस्तीवरील नागरीक जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक आर. बी. लोखंडे , पो. कॉ. सोमनाथ जायभाय व टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

श्वान पथकाला केले पाचारण

नगरहून श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. श्वान पथकाने घरापुढील रस्त्यापर्यंतच माघ काढला. यावरून चोरटे या ठिकाणाहून दुचाकीवर पसार झाले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news