बीड : मांजरा नदीतून वाळूचोरी प्रकरणी पोलिसांकडून तीन ट्रॅक्टरसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बीड : मांजरा नदीतून वाळूचोरी प्रकरणी पोलिसांकडून तीन ट्रॅक्टरसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून वाळू उपसा करून त्याची अवैद्य वाहतूक करणारे तीन विना नंबर ट्रॅक्टरसह २१ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल केज पोलिसांनी ताब्यात घेतला. आज (दि.२२) मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

केज तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून अवैद्य वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने आज मध्यरात्री १:१५ च्या सुमारास भोपला येथील मांजरा नदी पात्रात छापा टाकला. त्यावेळी वाळूची चोरटी वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर नदी पात्रात सोडून त्याचे चालक फरार झाले. पोलिसांनी तीनही विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर, तीन ट्रॉल्या व त्यातील वाळू असा एकूण २१ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस जमादार बाबासाहेब बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक व मालक यांच्याविरूध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस नाईक शिवाजी कागदे, पोलीस नाईक जाधव यांनी केली. पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.

               

               हेही वाचलंत का ? 

Back to top button