कोल्हापूर : स्मार्ट निर्णयातून करिअरला योग्य दिशा : प्राचार्य घोरपडे | पुढारी

कोल्हापूर : स्मार्ट निर्णयातून करिअरला योग्य दिशा : प्राचार्य घोरपडे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कॉलेजची निवड करताना विद्यार्थी आणि पालकांनी स्मार्ट निर्णय घेतला तर करिअरला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विजय घोरपडे यांनी व्यक्त केला.

दै. ‘पुढारी’ आणि भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर व दंत महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअरिंग, फार्मसी आणि डेंटल प्रवेश प्रक्रियेबाबत आयोजित मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. बुधवारी (दि. 14) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम घेण्यात आला.

बॅचलर ऑफ डेंटल सायन्स (बीडीएस) हा पाच वर्षे कालावधीचा डिग्री कोर्स असून त्यासाठी पीसीबी विषयासह बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी नीटचे गुण ग्राह्य धरण्यात येतात.
– डॉ. प्रसाद इंगळे

भारती विद्यापीठात केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर आहे. विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे
अद्ययावत ठेवावी. प्रवेशाबाबत सर्व माहिती भारती विद्यापीठातील सुविधा केंद्रात देण्यात येईल.
– प्रा. असित कित्तूर

फार्मा सेक्टर हे सॉफ्टवेअरनंतर परकीय चलन मिळवून देणारे भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे क्षेत्र आहे. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचा नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ—ेमवर्कमध्ये 79 वा क्रमांक आहे.
– डॉ. मनीष भाटिया

हेही वाचा;

Back to top button