Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेक दिनी संभाजी राजेंची भुमिका साकारलेल्या श्रीकांत कदम यांची शिवप्रेमींमध्ये चर्चा

Shivrajyabhishek : शिवराज्याभिषेक दिनी संभाजी राजेंची भुमिका साकारलेल्या श्रीकांत कदम यांची शिवप्रेमींमध्ये चर्चा
Published on
Updated on

ओझर; पुढारी वृत्तसेवा : नुकताच रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांच्या झालेल्या भेटीचा देखावा उपस्थित शिवप्रेमींच्या डोळ्यांचा पारणं फेडणारा ठरला. यातील संभाजी महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली त्या श्रीकांत कदम यांचे नाव सध्या शिवप्रेमींमध्ये चर्चेत आहे.

ओझर मिग (ता. निफाड) येथून शेतकरी कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत एक उदयनमुख कलाकार म्हणून विविध व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नाटकात देखील त्यांनी साकारलेली हिरोजी फर्जद यांची भूमिका नाशिककरांच्या पसंतीस उतरली होती. विशेष म्हणजे मेडिकल व्यवसाय संभाळत ते आपली कला जोपासत असून तरुणांना कलेची तपश्चर्या करण्यासाठी प्रेरित करत आहे.

शालेय जीवनात अभिनयाची आवड जोपासून श्रीकांत यांनी आपल्यातील संवेदनशील माणूस जागृत ठेवून स्वतःतील अभिनेत्याला घडवत नेले. विविध नाटकं, शॉर्ट-फिल्म, मालिका यांमधून ते अभिनयही करतात.

श्रीकांत हे दुसरीमध्ये असताना नाशिक मध्ये पार पडलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा हे महानाट्य पाहण्यासाठी गेले होते. त्यांची चुलते स्व.विनायकराव बाबुराव कदम यांनी त्यांना हे महानाट्य पाहण्यासाठी नेले होते. तेव्हा पासूनच त्यांना अभिनयाची खरी आवड निर्माण झाल्याचे श्रीकांत कदम यांनी सांगितले. ओझर मिग येथील या शेतकरी पुत्र असलेल्या श्रीकांत कदम यांनी अनेक ऐतिहासिक काळातील विविध पात्र साकारले आहेत. आपल्यातील कलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

ओझर शहर शिवजयंती उत्सव समितीमध्ये गेल्या १२ वर्षांपासून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर केला जात आहे. ग्रामीण भागातील युवक युवतींना सोबत घेत पूर्वी कोणत्याही प्रकारचा कामाचा अनुभव नसताना देखील 'शिवरायांचे आठवावे रूप' हे तब्बल ६० कलाकारांना सोबत घेत दीड तासाचे महानाट्य बसविले. यात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा प्रवास दाखविला जातो. आत्तापर्यंत ओझर सह, जेलरोड, सातपूर, अशोक नगर, ओझर टाऊनशिप, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी नाटकाचे सादर केले आहेत.

याच वर्षी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त "क्रांतिसूर्य युगपुरूष" या नावाचे महानाट्य बसवत ओझरकरांची वाहवा मिळविली. नाशिक येथे तपोवन मैदानात डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्यात हिरोजी फर्जद (मराठा सरदार) यांची भूमिका देखील त्यांनी साकारली आहे.

शिवराज्याभिषेक दिनी अनपेक्षित संधी अन त्या संधीचे सोने

दिनांक ६ जून रोजी रायगडावर पार पडलेल्या लाखो शिवप्रेमींच्या उपस्थिती मध्ये शिवराज्याभिषेक दिनी आपली कला सादर करण्याची संधी श्रीकांत कदम यांना चालून आली. छत्रपती संभाजी नगर येथील संदीप बोसर हे छत्रपती शिवाजी महाराज तर श्रीकांत कदम हे संभाजी महाराजांच्या भूमिकेत जात राजसदेरवर पन्हाळा गडावरील छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांची भेट सादर करत उपस्थित असणाऱ्या अनोखी भेट देत वाहवा मिळविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news