हुपरी उपनगराध्यक्षांनी केली राजीनाम्‍याची घोषणा | पुढारी

हुपरी उपनगराध्यक्षांनी केली राजीनाम्‍याची घोषणा

रेंदाळ ; पुढारी वृत्‍तसेवा :

हुपरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्‍यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर लठ्ठे यांनी घरगुती अडचणीमुळे उपनगराध्यक्ष पदाचा सोमवारी राजीनामा देणार असल्याचे घोषित केले.

उपनगराध्यक्ष अविश्वास ठराव दाखल केल्यावर राजकीय घडामोडींना वेग आला होता. सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटाचे सदस्य अज्ञात स्थळी होते. फोडाफोडीच्या राजकारणालाही गती आली होती. सत्ताधारी काही सदस्यांच्‍या संभ्रमित निर्णयामुळे काय होणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. घरात शुभकार्य आहे. त्‍यामुळे  मला वेळ देता येत नाही तरी मी सोमवारी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती लठ्ठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचलं का?

Back to top button