Kolhapur Bandh : आक्षेपार्ह स्टेट्सप्रकरणी बुधवारी कोल्हापूर शहर बंदची हाक

Kolhapur Bandh  : आक्षेपार्ह स्टेट्सप्रकरणी बुधवारी कोल्हापूर शहर बंदची हाक
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : एका तरूणाने जातीय तेढ निर्माण करणारा स्टेटस लावल्याने कोल्हापुरात आज (दि.६) तणावपूर्ण वातावरण बनले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. तर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Kolhapur Bandh on Wednesday)

शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला. दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बंडा साळुंखे यांनी केले आहे. कोल्हापुरात यापुढे कोणाचीही असा स्टेटस लावायची हिम्मत होणार नाही, असा बंद करणार असल्याचा इशारा बंडा साळुंखे यांनी दिला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news