कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये 26 टक्केच पाणीसाठा | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये 26 टक्केच पाणीसाठा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्रमुख 15 धरणांत रविवारी सकाळी आठ वाजता एकूण क्षमतेच्या 26.30 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षी दि. 4 जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता यावर्षी 20.41 टक्के कमी पाणीसाठा आहे. राधानगरी, तुळशी, दूधगंगा व वारणा या चार धरणांत तर गतवर्षीपेक्षा 22 टक्के पाणीसाठ्यात घट झाली आहे. पाऊस वेळेवर झाला नाही, तर जूनअखेरीस पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत आजअखेर 24.14 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवसापर्यंत तो 30.33 टीएमसी इतका होता. राधानगरी, तुळशी, वारणा आणि दूधगंगा या चार मोठ्या प्रकल्पांत 18.23 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी तो 23.4 टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत या प्रकल्पांत तब्बल 5.17 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख धरणांत 22 टक्के कमी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील स्थिती

मोठे प्रकल्प : 4
मध्यम प्रकल्प : 8
लघू प्रकल्प : 3
एकूण पाणी क्षमता : 91.76 टीएमसी
आजचा पाणीसाठा : 24.14 टीएमसी
गतवर्षीचा आजपर्यंतचा पाणीसाठा : 30.33 टीएमसी.
एकूण क्षमतेच्या तुलनेत आजचा पाणीसाठा : 26.30 टक्के
गतवर्षीच्या तुलनेत आजचा पाणीसाठा : 79.59 टक्के

Back to top button