Hasan Mushrif : अधिकाऱ्यांनी चिरीमिरी घेऊन पाणी सोडले की काय? : हसन मुश्रीफ

पालकमंत्री हसन मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ

कागल; पुढारी वृत्तसेवा : पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचा यावर्षी जपून वापर केलेला नाही तसेच पाण्याची नियोजन देखील केली नाही. त्यामुळे पाणीटंचाईला सामोर जावे लागेल असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. (Hasan Mushrif)

काळम्मावाडी धरणांमध्ये केवळ आठ टक्के पाणी म्हणजे दोन टीएमसी पाणी शिल्लक आहे. मान्सून दहा तारखे नंतर कोकणामध्ये दाखल होईल. त्यामुळे आपल्याकडे येण्यासाठी 15 जून उजवडेल अशी सध्याची स्थिती आहे. जून महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातच अलनिनोचा धोका हवामान खात्याने वर्तवला आहे. (Hasan Mushrif)

दूधगंगा प्रकल्पाला मोठी गळती आहे. ती काढण्यासाठी धरणातून कोणतेही नियोजन न करता पाणी सोडण्यात आले आहे. संबंधित विभागाने प्रशासकीय मंजुरी इस्टिमेट व त्यासाठी निधी उपलब्ध करून पुढील कार्यवाही करण्याची गरज होती. मात्र, तसे न करता सात टीएमसी पाणी धरणातून सोडून अधिकारी मोकळे झाले आहेत. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही पाणीटंचाई नैसर्गिक नसून अधिकारी व मानवनिर्मित असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.

राधानगरी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा होता. मात्र, सध्याच्या प्रचंड तापमानामुळे बाष्पीभवनाचा परिणाम होऊन धरणातील पाणी कमी झाले आहे. प्रकल्पातूनही अधिकाऱ्यांनी कर्नाटकात पाणी सोडून दिले आहे. हे पाणी सोडताना अधिकाऱ्यांनी कदाचित चिरीमिरी घेऊन हा प्रकार केला आहे की काय अशी शंकाही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news