कोल्हापूर : अतिविषारी घोणसने दिला ७० पिल्लांना जन्म; बिद्रीच्या सर्पमित्राने दिले जीवदान | पुढारी

कोल्हापूर : अतिविषारी घोणसने दिला ७० पिल्लांना जन्म; बिद्रीच्या सर्पमित्राने दिले जीवदान

बिद्री : टी. एम. सरदेसाई : साप! म्हटल्यानंतर अंगावर काटा उभारतो. त्यात विषारी साप पाहताच भितीने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो. मात्र बिद्री (ता. कागल) येथील सर्पमित्र सयाजी चौगले यांनी एका घरातून अतिविषारी घोणस जातीचा साप पकडला. त्याला सुरक्षित जागी सोडताना पिल्लांना जन्म देत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा घोणसला घरी आणले. घोणसने ७० पिल्लांना जन्म दिला त्यानंतर पिल्लांसह घोणसला पुन्हा जंगलाच्या दिशेने सोडून देवून जीवदान दिले.

कूर येथील बाजीराव मिसाळ यांच्या घरी साप शिरल्याची फोनवरून सयाजी यांना माहिती मिळाली. त्यांनी त्वरीत जावून साप पकडला असता ती घोणस जातीची मादी असल्याचे दिसून आले. त्यांनी या घोणसला पोत्यामध्ये बंद करून कात्यायनी जंगलात सोडताना घोणस पिल्लांना जन्म देत असल्याचे लक्षात आले. सयाजीने घोणसला पुन्हा घरी आणले. यामध्ये ७० पिल्लांना जन्म दिला होता. नंतर त्याने सर्व पिल्लांसह घोणस सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून दिले. सयाजी यांनी लहानपणापासून साप पकडण्याची कला अवगत केली आहे. आत्तापर्यंत तीन हजार विषारी व बिनविषारी साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून दिले आहेत. मागील वर्षी त्यांनी खोल कोरड्या विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जीवदान दिले होते. यासाठी विनायक चौगले, सुनील कांबळे, शिवम चौगले, सार्थक चौगले, हर्षद चौगले यांचे सहकार्य मिळत असल्याचे चौगले यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button