दानोळी जयसिंगपूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काेंडी; तरुणांनी पुढाकार घेत रस्ता केला मोकळा | पुढारी

दानोळी जयसिंगपूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक काेंडी; तरुणांनी पुढाकार घेत रस्ता केला मोकळा

दानोळी : पुढारी वृत्तसेवा : दानोळी येथे गुरुवारी सायंकाळी सुटलेल्या सुसाट वाऱ्याने जयसिंगपूर रोडवरील महाजन टेक सरकारी ओढा परिसरात झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक तासभर खोळंबली होती.

याची माहिती मिळतात पोलीस पाटील प्रशांत नेजकर, आदित्य उर्फ दादू धनवडे, बबलू दळवी, नितीन शिंदे – राऊत, सौरभ भिसे आणि अर्जुन माने यांनी धाव घेत झाड कोयता, कुरड व कटरच्या सहाय्याने कट करून बाजूला केले. त्यामुळे तासभर वाहतूकीस बंद असलेला रस्ता मोकळा झाला.

या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणत असते. या येथे उतर असल्याने वाहने सुसाट असतात. रात्री अपघात होण्याची शक्यता होती. याची दखल घेत तरुणांनी पुढाकार घेत रस्ता मोकळा केला. याचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

.हेही वाचा 

मुंडे बहिण भाऊ एकत्र वैद्यनाथ कारखाना निवडणूक बिनविरोध

महिलांच्या खुनांनी पाथर्डी हादरले! संशयावरून तरुणीचा गळा आवळला; दुसर्‍या घटनेत डोक्यात कुर्‍हाड घातली

तुळजापूर : देवीला अर्पण सोने, चांदी वितळवण्यात येणार; सोमवारपासून पार पडणार प्रक्रिया

Back to top button