कोल्हापूर : आणुर येथे टेम्पो-दुचाकीचा अपघात; ३ गंभीर जखमी

म्हाकवे (कोल्हापूर), पुढारी वॄतसेवा : कागल तालुक्यातील आनुर येथील भर वस्तीत असलेला म्हाकवे बानगे रोडवरील चौकात आज सकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकी व आयशर टेम्पो यांचा अपघात झाला. या अपघातात मुधाळ तालुका भुदरगड येथील संकेत सागर पाटील, पारस संदीप माने व आदित्य मानसिंग केसरकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे सातच्या सुमारास संकेत व पारस हे श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील हलसिद्ध नाथाचे दर्शन घेऊन MH 09.FZ-4543 या दुचाकीवरून मुधाकडे चालले होते. यावेळी MH-10 Z-2721 हा आयशर टेम्पो बस्तवडे कडून कागलकडे जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील टेम्पो लक्षात न आल्याने दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक बसली.
यामध्ये संकेत पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर पारस संदीप माने याच्या चेह-याला दुखापत झाली. हे दोघे गंभीर जखमी असून आदित्य हा किरकोळ जखमी आहे. जखमीना तात्काळ सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली असून कागल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहाणी केली. तसेच अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
.हेही वाचा
कोल्हापूर : ‘येळाणे’तील शाळी नदीला जलपर्णीचा विळखा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कोल्हापूर : बामणी येथील शेतात आढळला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय
‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची! मालिकेत नीना कुळकर्णी यांची एन्ट्री!