कोल्हापूर : बामणी येथील शेतात आढळला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय | पुढारी

कोल्हापूर : बामणी येथील शेतात आढळला तरुणाचा मृतदेह, खुनाचा संशय

सिद्धनेर्ली (ता. कागल), पुढारी वृतसेवा : कागल- निढोरी राज्य महामार्गावर बामणी (ता. कागल) हद्दीतील शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाच्या डोक्यात जबर दुखापत झाली आहे. या तरुणास अन्य ठिकाणी मारून या ठिकाणी मृतदेह आणून टाकण्यात आला होता. त्याची ओळख पटविण्याचे काम कागल पोलिसांकडून करण्यात आले आहे. अमरसिह दत्तात्रय थोरात (वय ३०) असे मृताचे नाव आहे. वाळवा तालुक्यातील गोठखिडे या गावतील हा तरुण आहे. तो कोल्हापूर येथील लॉ कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत असल्याचे समजते. सदर तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, नदीकिनारा लगत बामणी येथील हद्दीतील शेतामध्ये हा मृतदेह आढळून आला आहे. कागल- निढोरी महामार्गालगतच असणाऱ्या शेतातील झुडपात हा मृतदेह टाकण्यात आला होता. सकाळी या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या नजरेस सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर कागल पोलिसांना कळविण्यात आले. सदर घटनेची माहिती कागल पोलिसांना समजताच कागल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, कागलचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरविद काळे, करवीरच्या अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांच्यासह फॉरेन्सिकचे अधिकारी, श्वान पथक आदी घटनास्थळी दाखल झाले.

सदर घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button