दै. ‘पुढारी एज्यू दिशा’ प्रदर्शन : महाराष्ट्रातील प्रख्यात शैक्षणिक संस्थांची एकाच छताखाली मांदियाळी | पुढारी

दै. ‘पुढारी एज्यू दिशा’ प्रदर्शन : महाराष्ट्रातील प्रख्यात शैक्षणिक संस्थांची एकाच छताखाली मांदियाळी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दहावी, बारावीनंतर काय करावे, हा विद्यार्थी आणि पालकांसमोर मोठा गंभीर प्रश्न आहे. बारावीनंतर खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांच्या करिअरला प्रारंभ होतो. कोणत्या विद्या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल, या विवंचनेत पालक असतात. हा संभ्रम दूर करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै.‘पुढारी एज्यू दिशा’ हे मुलांच्या भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन येथे 27 ते 29 मे दरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत भव्य शैक्षणिक प्रदर्शन आणि करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांच्या शंका, अडचणी ते प्रश्नोत्तरांतून जाणून घेणार आहेत. तज्ज्ञांकडून मिळणार्‍या मार्गदर्शनामुळे उत्तुंग यशाचे ध्येय बाळगणार्‍या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या स्वप्नांना बळ लाभणार आहे.

कार्यक्रमात महाविद्यालयीन प्रवेश, दहावी, बारावीनंतरच्या शिक्षणांचे विविध पर्याय, तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरा मेडिकल, आर्किटेक्चर, माहिती- तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, अ‍ॅनिमेशन तसेच व्हीएफएक्स यासह अन्य अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यासह जेईई, नीट, सीईटी यासह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणार्‍या संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांसाठी दै. ‘पुढारी एज्यू दिशा’ वाटाड्याची भूमिका चोख बजावत आहे.

या प्रदर्शनासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक असून प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. तसेच एमआयटी – एडीटी युनिव्हर्सिटी पुणे आणि पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे हे सहयोगी प्रायोजक आहेत. अशोकराव माने ग्रुप, अंबप आणि चाटे शिक्षण समूह हे सहप्रायोजक आहेत. अधिक माहितीसाठी रोहित 9834433274, प्रणव 9404077990 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानमाला

  • शनिवार, दि. 27 मे 2023

सकाळी 10.30 वा. उद्घाटन

सकाळी 11.30 ते 1.00 – यूपीएससी, एमपीएससीमधील करिअर : तुकाराम जाधव (युनिक अ‍ॅकॅडमी )

दुपारी 1.00 ते 2.00 – इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी : प्रा. डॉ. राजेश जाधव (एमआयटी – एडीटी, पुणे)

दुपारी 4.00 ते 5.00 – इंजिनिअरिंग कॉलेज व शाखांची निवड, प्लेसमेंट : प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे (पिंपरी-चिंचवड एज्यु. ट्रस्ट)

सायंकाळी 5.00 ते 6.00 – आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – जगण्याशी जोडणारे विज्ञान : प्रा. डॉ. आनंद कुलकर्णी (एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे)

  • रविवार, 28 मे 2023

सकाळी 11.00 ते 12.00 – उच्च शिक्षणातील संधी व आव्हाने : डॉ. स्वप्निल हिरकुडे (संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर)

दुपारी 12.00 ते 1.00 – राष्ट्रसेवा आणि करिअरसुद्धा : लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राम्हणकर (अ‍ॅपेक्स करिअर अ‍ॅकॅडमी, पुणे)

दुपारी 2.30 ते 4.30 – व्हीएफएक्स : आकर्षक करिअर – ट्रेडिशनल लाईव्ह डेमो वर्कशॉप : तेजोनिधी भंडारे (रिलायन्स अ‍ॅनिमेशन स्टुडिओ, पुणे)

सायंकाळी 5.00 ते 6.00 – नीट व जेईई परीक्षांबाबत मार्गदर्शन- प्रा. एम. के. कुरणे (प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी, लातूर)

  • सोमवार, दि. 29 मे 2023

सकाळी 11.00 ते 12.00 – नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि भवितव्य : डॉ. एच. टी. जाधव (अशोकराव माने ग्रुप, अंबप)

दुपारी 12.00 ते 1.00 – दहावीनंतर नेमके काय करावे? – प्रा. डॉ. नितीन कदम (दिशा अ‍ॅकडमी, वाई)

दुपारी 4.00 ते 5.00 – व्यवस्थापन (मॅनेजमेंट ) शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि करिअर – प्रा. रणधीरसिंह मोहिते (यशोदा इन्स्टिट्यूट, सातारा)

सायंकाळी 5.00 ते 6.00 – कॉमर्समधील करिअरच्या अमाप वाटा : कपिला टिक्के (द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया)

हेही वाचा : 

Back to top button