Upsc Result : युपीएससी परीक्षेत नगरचा झेंडा! पाच उमेदवारांचे घवघवीत यश

Upsc Result : युपीएससी परीक्षेत नगरचा झेंडा! पाच उमेदवारांचे घवघवीत यश

Published on

नगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात नगरच्या पाच उमेदवारांनी देदिप्यमान यश मिळवले आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेत नगरचा टक्का वाढता आहे. मंगळवारी (दि. २३) जाहीर झालेल्या निकालात प्राथमिक माहितीत नगरचे पाच उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मंगेश खिलारी,( 396 वा क्रमांक, सुकेवाडी संगमनेर), सागर यशवंत खर्डे ( 445 वा क्रमांक, कोल्हार, ता. राहाता), श्रुती सुभाष कोकाटे ( 608 क्रमांक, चापडगाव, ता. कर्जत), स्वप्नील राजाराम डोंगरे ( 707 क्रमांक, मांची, संगमनेर), राजश्री शांताराम देशमुख ( 719 क्रमांक, पिंपरणे, संगमनेर) यांचा समावेश आहे. उत्तीर्ण उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news