कोल्हापूर : पाण्याचा वापर जरा जपुनच! राधानगरी धरणाचा पाणीसाठा खालावतोय! | पुढारी

कोल्हापूर : पाण्याचा वापर जरा जपुनच! राधानगरी धरणाचा पाणीसाठा खालावतोय!

राशिवडे; पुढारी वृतसेवा : कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागविण्यामध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावणाऱ्या राधानगरी धरणामधील पाणीसाठा खालावत चालला आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे बनले आहे. धरणामध्ये उपलब्ध असणारा २.८८ टी.एम.सी. पाणीसाठा जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर, पाणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जरा जपुनच पाणी वापरावे लागणार आहे.

राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्याची क्षमता ७ टी.एम.सी. इतकी आहे. आतापर्यत पाण्याचा तुटवडा कधीच भासलेला नाही. पाटबंधारे विभागाच्या अचूक नियोजनामुळे शेतीस व पिण्यास मुबलक पाणी उपलब्ध होते. परंतु यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार पाणी लागत असल्याने वरचेवर धरणातुन नदीपात्रामध्ये पाणी सोडावे लागत आहे. गतवर्षी याच दिवशी राधानगरी धरणामध्ये ३.५३ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक होता. परंतु सध्या धरणामध्ये २.८८ टी.एम.सी.पाणीसाठा शिल्लक आहे. एकुण पाणी साठवण क्षमतेच्या २८  टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा जुनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरवावा लागणार आहे. जुनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे. पाटबंधारे विभागाने अचुक नियोजन केले असले तरी पावसाने हुलकावणी दिली तर मात्र काही दिवसांसाठी पाणीबाणीची शक्यता निर्माण होऊ शकते.

हेही वाचलंत का ?

Back to top button