कोल्हापूर : सैनिक टाकळी येथे गायरान जमीन ताब्यात घेण्यासाठी अधिकारी दाखल; शेतकऱ्यांचा विरोध | पुढारी

कोल्हापूर : सैनिक टाकळी येथे गायरान जमीन ताब्यात घेण्यासाठी अधिकारी दाखल; शेतकऱ्यांचा विरोध

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यातील अकिवाट सैनिक टाकळी येथील अतिक्रमण केलेली बारा हेक्टर गायरान जमीन ताब्यात घेण्याची प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह दोन मंडळ अधिकारी, दहा तलाठी आणि दहा ग्रामसेवक यांचा ताफा जेसीबीसह दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी मात्र आम्हाला नोटिसा एक दिवस आधी मिळाल्या आहेत, अशी तक्रार करत अतिक्रमणाला विरोध केला आहे.

अकिवाट सैनिक टाकळी येथील शासकीय गायरान जमिनीवर ७५ शेतकऱ्यांनी १८ हेक्टर शेतीवर अतिक्रमण केले आहे. यापैकी तेरा शेतकऱ्यांनी ६ हेक्टर शेतजमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ६ हेक्टर वगळता १२ हेक्टर शेतीचा ताबा घेण्याची कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. ग्रामपंचायतीने ९८ शेती व्यावसायिक आणि रहिवास असणाऱ्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमणे हटवण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. रहिवास आणि व्यावसायिक अशी २३ अतिक्रमणे वगळता ७५ शेतकऱ्यांना नोटीसा लागू केल्या आहेत. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button