कोल्हापूर : दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा गाेंधळ, वाहतूक विस्कळीत | पुढारी

कोल्हापूर : दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा गाेंधळ, वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर शनिवारी संपला. परिक्षा संपताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली. कोल्‍हापूर येथील पद्माराजे, एस एम लोहिया, न्यू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच आनंद साजरा करत रंगपंचमी साजरी केली.

दरम्‍यान, विद्यार्थ्यांच्या या प्रकारामुळे तब्‍बल अर्धा तासाहून अधिक वेळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी पोहचले आणि मुलांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवला. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून होत असलेल्‍या गोंधळाबाबत शाळा प्रशासन काहीच दखल घेत नाही असे असे स्‍थानिक नागरीकांनी माहिती दिली. तसेच या अशा होणा-या घटनांना प्रशासनाने थांबवावे अशी मागणी केली आहे.

.हेही वाचा 

कोल्हापूर: अनुस्कुरा-मलकापूर मार्गावरील घाटात गॅस टँकर पलटी; चालक ठार

कोल्हापूर : ‘कासारी’ धरणात ५१ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४ टक्के पाणीसाठा कमी  

कोल्हापूर: पन्हाळा येथील ‘शाश्वत पर्यावरण विकास’ राष्ट्रीय परिषदेत १५० संशोधक सहभागी

Back to top button