कोल्हापूर : रंगकाम करणाऱ्याने केली सव्वा लाखांची चोरी

कोल्हापूर : रंगकाम करणाऱ्याने केली सव्वा लाखांची चोरी
Published on
Updated on

पेठवडगाव; पुढारी वृत्तसेवा : रंगकाम करणाऱ्या रंगाऱ्याने सव्वा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारून घर मालकाला चुना लावल्याचा प्रकार (पाडळी ता.हातकणंगले) वडगाव पोलिसांनी उजेडात आणला. साडे तीन महिन्यांपूर्वी चोरीची कबुली देणाऱ्या रंगारी विश्वजित कृष्णात दाभाडे (वय १९ रा. पिरगाई मळा, पाडळी ता. हातकणंगले) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित आरोपीकडून १ लाख २५ हजार किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले.

पाडळी येथील फिर्यादी सुशीला खामकर यांच्या घराचे साडे तीन महिन्यांपूर्वी रंगकाम सुरू होते. घराचे रंगकाम संशयित विश्वजित दाभाडे हा करत होता. दरम्यान, घरातील कपाटात ठेवलेले पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सौ.खामकर यांनी पोलिसांत दिली होती.

यानुसार पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली. पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीश शिंदे, पोलीस कर्मचारी दादा माने, राजेंद्र पाटील, संदीप गायकवाड यांच्या पथकाला गुन्हाचा छडा लावण्यात यश आले. संशयित रंगारी दाभाडे याने चोरी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

यानुसार संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र संशयितांकडून हस्तगत केले. याप्रकरणी संशयित विश्वजित दाभाडे याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news