कोल्हापूर : अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई | पुढारी

कोल्हापूर : अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीच्या गायरान हद्दीत निवासी व व्यावसायिक संकुल उभारून अतिक्रमणधारक असलेल्या ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दिनकर गाडवे यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अपात्र घोषित केले आहे. या प्रकरणात भाजपचे करवीर तालुका सरचिटणीस अक्षय पाटील यांनी तक्रार दाखल केली होती.

करवीर तालुक्यातील शिये ग्रामपंचायतीच्या सदस्यत्व अतिक्रमणाच्या मुद्यावरून रद्द झाल्याने आणखी काही सदस्यांचे धाबे दणाणले आहेत. आणखी एका विद्यमान महिला सदस्यासह आणखी दोन सदस्यांचे असेच प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिये ग्रामपंचायतीवर अशा स्वरूपाच्या आणखी तक्रारी दाखल होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button