

कौलव; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्ली व परिते गावाच्या हद्दीवर माळरानाला आज (दि.१६) दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले. डोंगरावर असलेली फळझाडे आणि जनावरांची वैरण जळून खाक झाली. आगीमुळे पूजा ट्रेडर्स या बगॅसच्या कंपनीचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले.
दुपारी बाराच्या सुमारास लागलेल्या आगीने आगीने रौद्ररूप धारण केले. भरत डोंगळे, निनाद पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा, काजूसह अन्य फळझाडे आणि जनावरांची वैरण जळून खाक झाली. येथेच बगॅस आणि मळीपासून तयार करण्यात येत असलेल्या गोळ्यांची पूजा ट्रेडर्स ही कंपनी देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या आगीत कंपनीत तयार केलेला पक्का माल पूर्ण जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. भोगावती व दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली.
हेही वाचा :