कोल्‍हापूर : अवचितवाडीत पोल्ट्री व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू | पुढारी

कोल्‍हापूर : अवचितवाडीत पोल्ट्री व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू

धामोड : पुढारी वृत्तसेवा केळोशी बु पैकी अवचितवाडी येथील आनंदा हरी किरुळकर (वय ४५) याचा मृतदेह आढळून आला आहे. आनंदा किरुळकर यांचा कुक्कुट पालनचा व्यवसाय असुन, त्यांच्या पोल्ट्री फर्मच्या शेजारी त्यांचा मृतदेह आज (शुक्रवार) सकाळी ग्रामस्थांना आढळुन आला.

काल (गुरुवार) सायंकाळी पाच वाजल्‍या पासून ते बेपत्ता होते. पत्नी व घरच्या लोकांनी शोधाशोध केली. मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला, पण त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कामानिमीत्त बाहेर गावी गेले असतील म्हणुन दुर्लक्ष केले. पण आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून, सदर घटनेची वर्दी केळोशी बुद्रुकचे पोलीस पाटील शशिकांत दिघे यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

दरम्यान आनंदा यांच्या शरिरावर व्रण आढळले असून, त्यांचा घातपात झाला असल्याचा आरोप पत्नी सुनंदा किरुळकर यांनी केला आहे. राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास पो.नि. स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

हेही वाचा : 

Back to top button