थंडी वाढणार; राज्याला भरणार पुन्हा हुडहुडी | पुढारी

थंडी वाढणार; राज्याला भरणार पुन्हा हुडहुडी

पुढारी ऑनलाईन: पुढचे काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यातील किमान तापमानात घट होणार आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा हुडहुडी भरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक प्रभाव उत्तर विदर्भ व उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही भागात जाणवणार आहे. त्यामुळे १३ ते १४ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील थंडी पुन्हा वाढणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक भागात 15 अंश सेल्सिअसपेक्षा किमान तापमानाची नोंद झाली आहे. यामध्ये सातारा 14.4 °C,  औरंगाबाद 10.2 °C, नांदेड 15.2 °C, नाशिक 12.5 मराठवाडा 15.2 °C, उदगीर 15.8 °C, जळगाव 10 °C, परभणी 13.6 °C, बारामती 12.6 °C आणि उस्मानाबादमध्ये 14.6 °C इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button