महाराष्ट्रातील पोटनिवडणूका न लढवण्याचा आम आदमी पार्टीचा निर्णय; कसबा पोटनिवडणूकीतून माघार | पुढारी

महाराष्ट्रातील पोटनिवडणूका न लढवण्याचा आम आदमी पार्टीचा निर्णय; कसबा पोटनिवडणूकीतून माघार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतून आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने आज शेवटच्या दिवशी माघार घेतली, अशी माहिती आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी दिली आहे.

आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होत आहे. महाराष्ट्रातील खोक्या – बोक्याच्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळलेली आहे. मागच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची संगीत खुर्ची राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे. कोणताही प्रस्थापित पक्ष कोणत्याही इतर प्रस्थापित पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतो. कोणतीही वैचारिक भूमिका नाही, हे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. आमदारांनी राजकीय पक्ष बदलण्यासाठी अथवा सत्तेत भागीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याच्या चर्चा जनसामान्यांमध्ये दररोज घडत आहेत. लोक या प्रकाराला कंटाळले आहेत, असे मेमन यांनी म्हटले आहे.

Back to top button