बाळासाहेब थोरात खिंड सोडून पळाले : राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

बाळासाहेब थोरात खिंड सोडून पळाले : राधाकृष्ण विखे-पाटील

कराड; पुढारी वृत्तसेवा :  मी ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडलो, त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना करत बाजीप्रभू देशपांडे यांच्याप्रमाणे आपण खिंड लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता ते खिंड सोडून पळाले आहेत,अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. कराडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते माध्‍यमांशी बोलत होते.

मंत्री विखे – पाटील म्हणाले, अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा भाजपमुळेच विजय झाला आहे. त्याचबरोबर त्यांनी विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे यातूनच सर्व काही स्पष्ट होते. आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असे स्पष्ट करत महसूल मंत्री विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी साद घातली.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देतकराड दक्षिणचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

 

 

Back to top button