कोल्हापूर : दत्तवाड येथे ऋषिकेशानंद महाराज यांचा पिठाभिषेक कार्यक्रम उत्साहात

कोल्हापूर : दत्तवाड येथे ऋषिकेशानंद महाराज यांचा पिठाभिषेक कार्यक्रम उत्साहात
Published on
Updated on

दत्तवाड: पुढारी वृत्तसेवा : दतवाड येथील सद्गगुरु बाबा महाराज मठाच्या ऋषिकेशानंद महाराज यांच्या पिठाभिषेक कार्यक्रम उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. गणेश पूजन, होम हवन धार्मिक कार्यक्रम व ध्वजारोहणाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी, श्री शृ. भ्र. डॉ. पालाश शिवयोगेश्वर, श्री श्रो ब्र चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी हुक्केरी, राजेंद्र पाटील यड्रावकर, करणसिंग घोरपडे सरकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सद्गगुरु बाबा महाराज मठाच्या पिठाभिषेक कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक वातावरणात व संत प्रवचनात झाली. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री जगदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी भारतात असलेल्या पुरातन संत परंपरेचा उल्लेख करून याची जगाला गरज असल्याचे प्रतिपादन केले. दतवाड येथे असलेल्या बाबा महाराजांच्या मठाचे वैशिष्ट्य गृहस्थाश्रमात राहून समाजाला ज्ञानोपासना करण्याचे काम या मठात होते. त्यामुळे येथील परंपरा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गावातील प्रमुख मार्गावरून अवाजंत्री रथ, घोड्याच्या लवाजम्यासह कलश मिरवणूक काढण्यात आली.  प्रमुख मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. याप्रसंगी भजन, कीर्तन, प्रवचन या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला. गुरूवारी (दि. २६) पहाटे पिठाभिषेक कार्यक्रमाचा मुख्य धार्मिक सोहळा मुख्य मठामध्ये पंडित डॉ. महांतेश शास्त्रीजी यांच्या विधीयुक्त वैदिक संस्कारात पार पडला.

कार्यक्रमास शिवानंद भारती महास्वामीजी इचलकरंजी, पंचम विश्व लिंगेश्वर महास्वामीजी नीडसोशी, दयानंद सरस्वती महास्वामीजी पूर्णानंद आश्रम, आलमप्रभुजी महास्वामीजी, चिदानंद महास्वामीजी, सिद्धारूढ शरणारू रामण्णा शरणारू बेनवाड, अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी, मातोश्री ललिताम्मा माताजी या स्वामींनी भेट देऊन आशीर्वचन दिले. याप्रसंगी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार. उल्हास पाटील, पी. एम. पाटील, माधवराव घाटगे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले. यावेळी कर्नाटक महाराष्ट्रातील मठाचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news