कोल्‍हापूर : किरीट सोमय्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; म्हणाले, “ज्या मुश्रीफांनी थांबवलं होतं तेच…” | पुढारी

कोल्‍हापूर : किरीट सोमय्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; म्हणाले, "ज्या मुश्रीफांनी थांबवलं होतं तेच..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्यानंतर पाच दिवसांनी भाजप नेते किरीट सोमय्या आज ( दि. १६) कोल्हापुरात आले. श्री अंबाबाई मंदिरात त्‍यांनी दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्‍हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी अंबाबाईच्या दर्शनाला येण्यापासून थांबवलं होतं, दारात येऊ दिलं नव्हतं, तेही आता थांबले आहेत, कारवाई झाल्यानंतर मुश्रीफांना धर्म आठवला आहे.”

या वेळी सोमय्या म्हणाले की, “महालक्ष्मी मातेकडे भारतमातेसाठी प्रार्थना केली. नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे. जी २० चे नेतृत्व देशाकडे आहे. त्या गतीने विकासात पुढे जायचं आहे. विकासाचे फळ छोट्या शेतकऱ्यांना मिळायचं असेल तर महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त, माफियामुक्त करावे लागणार. तो विडा मी उचलला आहे. त्यासाठी महालक्ष्मीकडे आशीर्वाद मागितला आहे.”

सोमय्या यांच्या दौर्‍याला कोणीही विरोध करणार नाही, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले होते. यावर बोलताना ते म्हणाले, “उपरवाले के सामने नीचेवाले का कुछ नही चलता, ज्या हसन मुश्रीफांनी थांबवलं होतं तेच आता थांबले आहेत. कारवाई झाल्यानंतर मुश्रीफांना धर्म आठवला. ही सगळी नाटक आहेत. ही अक्कल राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यावेळी कुठे गेली होती. ज्यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील होते तेव्हा मुश्रीफांनी मला कोल्हापूरला दर्शनाला जाऊ देवू नका, असे सांगितले होते. शरद पवार यांनीही आदेश दिले होते. त्या वेळी मला जेलमध्ये टाकण्‍यात आले होते.”

संबंधित बातम्या

आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती असा दावा मुश्रीफ यांनी केला होता, यावर बोलताना ते म्हणाले की, “त्यांच्या घोटाळ्याचे पुरावे आणि माहिती पाहून ते चिंतीत झाले आहेत. म्हणून अशी वक्तव्य करत आहेत. त्यांनी घोटाळ्याबाबत कोणतेही उत्तर दिलेल नाही.”

हेही वाचा :

Back to top button