Hasan Mushrif Vs Kirit Somaiya : किरीट सोमय्या येणार कोल्हापूरला; जाणून घ्या कारण | पुढारी

Hasan Mushrif Vs Kirit Somaiya : किरीट सोमय्या येणार कोल्हापूरला; जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या निवासस्थानावर केंद्रीय तपास यंत्रणेने छापा टाकले. यासंदर्भात  माध्यमांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले होते की,”कोल्हापूरच्या महालक्ष्मीने मला आशीर्वाद दिला आणि हसन मुश्रीफांचे काऊंटडाऊन सुरू झाले.” आज त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत म्‍हटलं आहे की, “मी लवकरचं कोल्हापूरला येणार आहे. आई महालक्ष्मीचे आशीर्वाद दर्शन घेण्यासाठी मी पुढील आठवड्यात कोल्हापूर जाणार”. (Hasan Mushrif Vs Kirit Somaiya)

महालक्ष्मीने मला आशीर्वाद दिला – किरीट सोमय्या

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी  किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी २०२३  मध्ये कोणाकोणाचे घोटाळे उघडकीस आणणार याची यादी आपल्या अकाउंटवर ट्विट करत शेअर केली होती. बुधवारी (दि.११) हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर सक्‍तवसुली संचालनालयाच्‍या (ईडी) अधिकार्‍याने छापा टाकला. यानंतर माध्‍यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले होते की, “हसन मुश्रीफांनी घोटाळ्याचे १५८ कोटी रूपये स्वत:च्या व नातेवाईकांच्या नावाने घेतले. कोलकात्‍याच्‍या बोगस कंपन्यांमधून पैसे आपल्या साखर कारखान्याकडे वळविले; पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीने मला आशीर्वाद दिला आणि हसन मुश्रीफांचे काऊंटडाऊन सुरू झाले. आता सर्व घोटाळ्यांचा हिशोब घेऊनच राहणार. त्यांच्यावर फक्त आरोप केलेले नाहीत तर पुरावे दिले आहेत.”

Hasan Mushrif Vs Kirit Somaiya : आता सगळ्याचा हिशोब घेणार 

उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबले होते. २८ सप्टेंबरला कोल्हापूरला घोटाळे काढण्यासाठी जात होतो; पण मुश्रीफांनी जाऊ दिले नाही. महालक्ष्मीचे दर्शन घेऊ दिले नाही. आता सगळ्याचा हिशोब घेणार. पैसे घेताना, भ्रष्टाचार करताना धर्म आठवत नव्हता का? भ्रष्टाचार करणारे माफिया मंत्री असतात, त्यांना जात-धर्म नसतो, तो घोटाळेबाज मंत्री असतो त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button