कोल्हापूर : जनसागराचा ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव! | पुढारी

कोल्हापूर : जनसागराचा ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अपूर्व उत्साहात, जनसागराकडून शुभेच्छांच्या अखंड वर्षावात दैनिक ‘पुढारी’चा वर्धापन दिन रविवारी थाटात साजरा झाला. तमाम वाचकांच्या असीम पाठबळावर, दै. ‘पुढारी’ने 85 व्या वर्षात पदार्पण केले. रोषणाईने नटलेल्या टाऊन हॉल बागेत साजर्‍या झालेल्या या सोहळ्याला उदंड गर्दी करत कोल्हापूरकरांनी दै. ‘पुढारी’शी असलेले पिढ्यान्पिढ्यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट केले. नववर्षाचा प्रारंभ आणि दै. ‘पुढारी’चा वर्धापन दिनाचा हा सोहळा कोल्हापूरकरांसाठी आनंददायी ठरला.

दै. ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयासमोरील टाऊन हॉल बागेत सायंकाळी पाच वाजल्यापासूनच विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह समाजातील सर्वच स्तरांतील प्रमुख घटकांनी तसेच ‘पुढारी’वर प्रेम करणार्‍या वाचकांनी शुभेच्छांसाठी गर्दी केली. दै. ‘पुढारी’ची इमारत, टाऊन हॉलची इमारत तसेच संपूर्ण बाग आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. सनईचा मंजूळ स्वर आणि पोलिस बँडची धून, यामुळे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, समूह संपादक व ‘पुढारी’चे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांचे मुख्य व्यासपीठावर आगमन होताच, शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी झाली.

दै. ‘पुढारी’शी असलेले पिढ्यान्पिढ्यांचे संबंध, सर्वसामान्यांच्या हितासाठी दैनंदिन जीवनात असलेले ‘पुढारी’चे योगदान, सार्वजनिक आंदोलनांत जनसामान्यांच्या बाजूने उभा राहणारा ‘पुढारी’, त्यातून उभारलेली दिशादर्शक आंदोलने आदींच्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक जण आपुलकीने डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांच्याशी संवाद साधत होते. तितक्याच जिव्हाळ्याने डॉ. जाधव त्यांची विचारपूसही करत होते.

दै. ‘पुढारी’ची चौथी पिढी राजवीर योगेश जाधव आणि तेजराज योगेश जाधव हेही व्यासपीठावर उपस्थित होते. ‘पुढारी’च्या या नव्या पिढीबरोबरही अनेकांनी संवाद साधला. भाऊसिंगजी रोडवरील टाऊन हॉल बागेचे मुख्य प्रवेशद्वार आकर्षक स्वागत कमानीने सजवले होते.

दै. ‘पुढारी’ व टोमॅटो एफ.एम. परिवारांकडून स्वागत केले जात होते. रोषणाईने उजळलेल्या मार्गावरून नागरिक मुख्य समारंभस्थळी जात होते. आकर्षक व्यासपीठ आणि त्यासमोर असलेला सारा परिसर गर्दीने फुलून गेला होता. रात्री उशिरापर्यंत ओसंडणारी ही गर्दी कोल्हापूर म्हणजे दै. ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’ म्हणजेच कोल्हापूर, या गेल्या 84 वर्षांपासून असलेल्या समीकरणाची साक्ष देत होते. सोहळ्याला सामाजिक, राजकीय, व्यापार, उद्योग, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, महिला संघटनांतील मान्यवरांसह विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

बालकल्याण संकुलासाठी मदत निधी देण्याचे आवाहन ‘पुढारी’ परिवाराने केले होते. त्यालाही उदंड प्रतिसाद देत उपस्थितांनी भरघोस मदत केली.

‘पुढारी’च्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त शाहू महाराज, खा. संजय मंडलिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. पी. एन. पाटील-सडोलीकर, आ. प्रकाश आवाडे, आ. जयश्री जाधव, आ. राजूबाबा आवळे, आ. जयंत आसगावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सर्वश्री बजरंग देसाई, दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, मालोजीराजे, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके, उद्योगपती संजय घोडावत, वाळव्याच्या हुतात्मा सहकारी संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व संचालक बाळासाहेब होनमोरे, जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, स्वामी विवेकानंद शिक्षण संंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अरुण डोंगळे, चेतन नरके, अजित नरके, कोल्हापूर महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी,

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, कॅप्टन शिवाजीराव महाडकर, उद्योजक व्ही. बी. पाटील, प्रा. जयंत पाटील, भरत ओसवाल, सुरेंद्र जैन, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, अभिनेता विजय पाटकर, राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, कॉ. दिलीप पोवार,

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दगडू कांबळे, रिपब्लिकन पार्टी (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, रिपब्लिकन पार्टीच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे, शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस बाबुराव कदम, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, साखर उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश खडके, लक्ष्मीपुरी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्ष रज्जूबेन कटारिया, हरेश जैन, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर,

अरिहंत फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास पाटील, कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, रायगड जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, प्रसाद कामत, शिवराज जगदाळे, डॉ. संतोष प्रभू, डॉ. अजित लोकरे, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. उमेश कदम, डॉ. संदीप पाटील, डॉ. वसीम मुल्ला आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा :

Foreign Investment In India : चिनी कोरोना, अमेरिकन मंदीतही विदेशी गुंतवणुकीत भारताची चांदी

Unemployment Rate Jumps : नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का; भारतातील बेरोजगारीने गाठला उच्चांक

Back to top button