Foreign Investment In India : चिनी कोरोना, अमेरिकन मंदीतही विदेशी गुंतवणुकीत भारताची चांदी | पुढारी

Foreign Investment In India : चिनी कोरोना, अमेरिकन मंदीतही विदेशी गुंतवणुकीत भारताची चांदी

नवी दिल्ली / मुंबई; वृत्तसंस्था : चीनसह जगभरातील अनेक देशांत कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना व अमेरिकन बाजारावर मंदीचे सावट घोंगावत असतानाही भारतीय बाजारातील परकीय गुंतवणूक जोमात आहे. नोव्हेंबरपाठोपाठ डिसेंबरमध्येही म्हणजे सलग दुसर्‍या महिन्यात एफपीआयमधून विशुद्ध खरेदीपोटी केवळ आणि केवळ आवकच झालेली आहे. डिसेंबर महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात तब्बल 11 हजार 119 कोटींची गुंतवणूक केली आहे. (Foreign Investment In India)

विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदार (एफपीआय) सध्या जरा सतर्कच आहेत. नोव्हेंबर महिन्यात एफपीआयच्या माध्यमातून 36 हजार 239 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत डिसेंबरमधील गुंतवणूक कमीच होती. असे असले तरी जगात सगळेच सापेक्ष असते म्हणून भारताच्या दृष्टीने हे तसे मोठेच यश म्हणावे लागेल. जगात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले असताना आणि अमेरिकेतील मंदीचे सावट अवघ्या जगावर असताना डिसेंबरमधील भारतातील ही गुंतवणूक काही थोडीथोडकी नाही, असे अर्थतज्ज्ञांतून मानले जाते. (Foreign Investment In India)

2022 तसे खडतरच, पण… (Foreign Investment In India)

  • भारतीय इक्विटी बाजारांत डिसेंबरमध्येही नोव्हेंबरप्रमाणेच एफपीआय शुद्ध खरेदीदार म्हणून कायम राहिले आणि यादरम्यान अनेक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून नफाही कमावला.
  • अर्थात एफपीआय इनफ्लोच्या हिशेबाने सन 2022 हे काही फार चांगले वर्ष नव्हते. एफपीआयने 2022 मध्ये भारतीय इक्विटी बाजारांतून 1.21 लाख कोटी रुपये काढून घेतलेले आहेत.
  • यापूर्वीच्या तिन्ही वर्षांत पूर्णपणे शुद्ध गुंतवणूक झाली होती. 2022 मधील नोव्हेंबर व डिसेंबर हे दोन महिने शुद्ध गुंतवणुकीच्या दृष्टीने फलदायी ठरले आहेत, एवढेच!

टॉप 10 पैकी 8 कंपन्यांना लाभ; दोन्हींना फटका

गेल्या आठवड्यात 10 सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे मूल्यांकन 1,35,794.06 कोटी रुपयांनी वाढले आहे. स्टेट बँक, रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ असून, केवळ हिंदुस्तान युनिलिव्हर आणि भारती एअरटेलमध्येच घसरण झाली.

या कंपन्या टॉप 10

  • रिलायन्स इंडस्ट्रीज
  • टीसीएस
  • एचडीएफसी बँक
  • इन्फोसिस
  • आयसीआयसीआय बँक
  • हिन्दुस्तान युनिलिव्हर
  • भारतीय स्टेट बँक
  • एचडीएफसी
  • भारती एअरटेल
  • अदानी एन्टरप्रायजेस

अधिक वाचा :

Back to top button