Kolhapur Grampanchayat Election 2022 : ‘ईव्हीएम’ ओपन न झाल्याने तरसंबळे मतमोजणी स्थगित; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष | पुढारी

Kolhapur Grampanchayat Election 2022 : 'ईव्हीएम' ओपन न झाल्याने तरसंबळे मतमोजणी स्थगित; निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील तिसऱ्या फेरीत घेण्यात आलेल्या तरसंबळे ग्रामपंचायतच्या मतमोजणी वेळी प्रभाग क्रमांक तीन मधील एक ईव्हीएम ओपन झाले नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल राखीव ठेवला असून प्रभाग तीनची मतमोजणी स्थगित केली आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकार आहे.

Kolhapur Gram Panchayat Election | धैर्यशील माने यांनी त्यांच्या गावात गड राखला, कागलमध्ये मुश्रीफांना धक्का

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार ईव्हीएम ओपन करण्याचा तीन वेळा प्रयत्न करूनही मशीन ओपन झाले नाही. त्यामुळे तहसीलदार मीना निंबाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे पुढील मार्गदर्शन मागवले आहे. दरम्यान, दोन प्रभागातील मतदान आणि तिसऱ्या प्रभागातील एक मत यातील मतदानावर सरपंच पदाचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी येथील सरपंच पदाच्या उमेदवार मनीषा राजाराम सुतार यांनी केली आहे. तरसंबळे येथे रविवारी मतदान सुरू असताना प्रभाग तीनमधील ईव्हीएम 154 मतदान झाल्यानंतर बंद पडले होते. त्यानंतर दुस-या ईव्हीएमवर मतदान घेण्यात आले. त्यावर उर्वरीत 154 मतदानाची नोंद झाली. मात्र आज मतमोजणीवेळी हेच बदली ईव्हीएम ओपन झाले नाही. या संदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे तरसंबळे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button