केंद्र सरकारसंदर्भात खोटी माहिती पसरवित असलेल्या युट्यूब चॅनेलपासून सावध राहण्याचे ‘पीआयबी’ आवाहन | पुढारी

केंद्र सरकारसंदर्भात खोटी माहिती पसरवित असलेल्या युट्यूब चॅनेलपासून सावध राहण्याचे 'पीआयबी' आवाहन

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा – केंद्र सरकारविरोधात काही यूट्यूब चॅनेल चुकीची माहिती पसरवित असून त्यापासून लोकांनी सावध रहावे, असे आवाहन सरकारच्या अखत्यारितील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) केले आहे.

न्यूज हेडलाईन्स नावाच्या यूट्यूब चॅनेलचे दहा लाखांपेक्षा जास्त सदस्य असून या चॅनेलवरुन केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोग तसेच न्यायपालिकेच्या अनुषंगाने धांदात खोटी व चुकीची माहिती पसरवली जात आहे. निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मशिनऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्याचे आदेश सरन्यायाधिशांनी दिले आहेत, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केलेली आहे, महाराष्ट्र सरकार पडले असून महाविकास आघाडी नवीन सरकार स्थापन करणार आहे, अशा स्वरुपाची खोटी माहिती या चॅनेलवरुन पसरवली जात असल्याचे पीआयबीने म्हटले आहे.

सरकारी अपडेट नावाच्या यूट्यूट चॅनेलचे 22 लाख सदस्य असून या चॅनेलवरुन सरकारी योजनांबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे तर आजतक लाईव्ह नावाच्या यूट्यूब चॅनेलचे 65 हजार सदस्य असून त्यावरुन राजकीय नेत्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे पीआयबीने म्हटले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button