कोल्हापूर: राधानगरी मार्गे कोकणकडे जाणारा राज्यमार्ग उद्या वाहतुकीसाठी बंद | पुढारी

कोल्हापूर: राधानगरी मार्गे कोकणकडे जाणारा राज्यमार्ग उद्या वाहतुकीसाठी बंद

राशिवडे(कोल्हापूर), पुढारी वृतसेवा :  ग्रा.पं.मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी मार्गे फोंडा,कोकणकडे जाणारा राज्यमार्ग उद्या ( दि. १९ )वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांनी दिली.

राधानगरी तहसील कार्यालयाशेजारी शासकीय धान्य गोडाऊन मध्ये तालुक्यातील ६६ ग्रा.पं.निवडणुकींची मतमोजणी होणार आहे. उमेदवारांसह समर्थकांची होणारी गर्दी लक्षात घेता राधानगरीमध्ये कोणत्याही वाहानांना प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी संपल्यानंतर दुपारनंतर हा कोकण राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे पाेलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा 

Back to top button