Stock Market Today : संभाव्य जागतिक मंदीचा परिणाम; शेअर बाजाराची सावध सुरुवात | पुढारी

Stock Market Today : संभाव्य जागतिक मंदीचा परिणाम; शेअर बाजाराची सावध सुरुवात

Stock Market Today : संभाव्य जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आज सोमवारी (दि.१९) स्थिर सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २३० अंकांनी वाढून ६१,५०० वर तर निफ्टी ६७ अंकांच्या वाढीसह १८,३०० वर होता. आगामी तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी उलाढालीचा अंदाज समोर आल्यानंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी) स्टॉक ०.५ टक्क्यांने घसरले. वैयक्तिक शेअर्समध्ये सन फार्मा सुमारे २ टक्क्यांनी घसरला. मुख्यतः आयटी शेअर्समध्ये विक्रीचा जोर वाढला आहे. फार्मा आणि ऑटो शेअर्सवरही काही प्रमाणात दबाव दिसून आला.

तर आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज एनएसई ०.५१ टक्क्यांनी आणि भारती एअरटेल एनएसई २.२७ टक्क्यांनी वधारला आहे. सेन्सेक्सवर इन्फोसिस, सन फार्मा, टाटा मोटर्स, विप्रो हे टॉप लुजर्स होते. एचडीएफसी बँक, टीसीएस, एल अँड टी, टायटन, टेक महिंद्रा, मारुती आणि एशियन पेंट्स यांचे शेअर्सदेखील खाली आल्याचे दिसून आले.

आजच्या व्यवहारात आशियातील बहुतांश प्रमुख बाजारांवर दबाव दिसून येत आहे. SGX निफ्टी ०.२० टक्क्यांनी वाढला आहे तर निक्केई निर्देशांक १.११ टक्क्यांनी घसरला आहे. तर हँगसेंगमध्ये ०.०२ टक्क्यांनी खाली आला आहे. तैवान वेटेडमध्ये ०.३९ टक्के आणि कोस्पीमध्ये ०.३५ टक्के घट झाली आहे. तर वेळी शांघाय कंपोझिट १.२० टक्क्यांनी घसरला आहे.

हे ही वाचा :

Back to top button